घाऊक महागाई वाढीचा दर घसरला   

नवी दिल्ली : किरकोळ महागाई वाढीच्या दर सहा वषांर्ंंत कमी झाल्याची आकडेवारी नुकतीच प्राप्त झाल्यानंतर बुधवारी घाऊक महागाई वाढीच्या दरात एप्रिलमध्ये ०.८५ टक्के घट झाली असल्याचे सरकारी आकडेवारीनुसार स्पष्ट झाले. अन्नपदार्थ, उत्पादन वाढले आणि इंधनाच्या दरात घट झाल्यामुळे घाऊक महागाईच्या वाढीच्या दरात घट झाल्याचे काल स्पष्ट झाले. मार्चमध्ये घाऊक महागाई दर २.०६ टक्के होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये १.१९ टक्के होता. मात्र, यंदा गेल्या महिन्यात तो आणखी कमी झाला. अन्नपदार्थांचे आणि अन्य  वस्तूंचे उत्पादन वाढले. त्यात रसायन, रासायनिक पदार्थ, वाहतूक वस्तूंचे आणि यांत्रिक उत्पादने वाढली, अशी माहिती उद्योग मंत्रालयाने दिली.

Related Articles